अभिप्राय

संस्थेबद्दल अभिप्राय

अभिप्राय

मी शिंदे विक्रम विष्णु लोकमंगल समूहातील एक सदस्य असून लोकमंगल समूहाच्या सहकार्यामुळे आज माझी आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रा मध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ज्यावेळी लोकमंगल समूहाची स्थापना झाली त्या वेळे पासून मी लोकमंगल समूहाशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहिलो. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून जीवन संघर्षमय जगत असताना लोकमंगल पतसंस्था यांच्या कडून मला शेती सुधारणा, नवीन शेती घेण्यास वाहन घेण्यास वेळो वेळी कर्जाची मदत झाली. म्हणून आज चार एकर जमिनी पासून ते पन्नास एकर बागायत जमिनी पर्यंत चा टप्पा मला गाठता आला. एरव्ही सायकल साठी धडपडनारा मी आज चार चाकी गाडी झायलो मधून फिरतो आहे. म्हणून लोकमंगल परिवाराचे आभार मानवसे वाटते. परंतु आभार कसे मानणार कारण आभार हे पाव्ह्न्यांचे मानायचे असतात. मी तर लोकमंगल परिवाराचा सदस्य आहे म्हणून ऋणी आहे.

-श्री. विक्रम विष्णु शिंदे

मु. पो. हराळवाडी

ता. मोहोळ जि. सोलापूर

मो. नं. ९९२१६६४१४७

अभिप्राय

मी. २००८ पासून लोकमंगल समूहाशी जोडलो गेलो आहे, सुरुवातीला माझा सलून व्यवसाय होता लोकमंगल पतसंस्था शाखा कुरूल येथून मी २००८ साली प्रथम २५००० रुपयांचे कर्ज घेतले व सलून व्यवसायास कापड व्यवसाय हा जोडधंदा सुरु केला २००८ पासून दरवर्षी मी कर्ज घेवून व्यवस्थित परत फेड करत आहे. यातून मी माझ्या आर्थिक गरजा भागवून दोन मुलांना इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून दोन्ही मुले सध्या नौकरी करत आहेत. कर्ज स्वरुपात लोकमंगल पतसंस्थेचे मला मोलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद...

-श्री. ज्ञानदेव विठोबा चौधरी

सय्यद वरवेड, ता. मोहोळ,

जि. सोलापूर

व्यवसाय : सलून व्यवसाय


अभिप्राय

लोकमंगल, या नावातच "लोकांच्या मांगल्याचा" ध्येय यातून प्रचीतीस येतो. 'बापू' तुम्हच्या कार्यकौशल्यावर जनतेनं जो विश्वास दाखवला तो अखंडपणे वृद्धिंगत व्हाव हिच ईश्वर चरणी प्रार्थना. सहकार हा समाजातील सांघिक भावनेचा, व्यवहाराचा, विश्वासाचा अद्वितीय असा कल्पवृक्ष आहे. या मनोसंकल्पना पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षास नेहमी बहर यावा यासाठी ठेवीदार, संचालक, कर्जदार आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कर्जदारांसाठी नेहमी दक्ष रहावे हि विनंती करतो. धन्यवाद...!

-श्री. मधुकर

अभिप्राय

सोलापूर जिल्ह्यातील पतसंस्थांची स्थिती पाहता, अशा संस्थांवरचा विश्वास उडत असल्याचे एकंदर चित्र आहे. परंतु लोकमंगल समूहातील सर्व सहकारी संस्था पाहता, संस्था कशा असाव्यात याचा आदर्श सांगतात. लोकमंगल पतसंस्था अतिशय विश्वासाची, सचोटीची आणि ठेवीदारांना सुरक्षेची हमी देणारी आहे. या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच सदिच्छा.

- श्रीनिवास दासरी

उपसंपादक : दिव्य मराठी


अभिप्राय

लोकमंगल समूह बद्दल बोलण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कि, लोकमंगल परिवाराची सदस्य आहे. मला लोकमंगल नागरिक पतसंस्थेकडून मला शैक्षणिक कर्ज मिळाल्यामुळे मी माझे शिक्षण पूर्ण केले. लोकमंगल समूह हे सामाजिक कार्य करत आहे त्याबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज मी माझे कुटुंब सांभाळू शकले. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. माझी आई मिळेल ते काम करून माझे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी मी लोकमंगल पतसंस्थेची मदत घेतली अशा प्रकारे मी लोकमंगल परिवाराची सदस्य झाले आणि माझ्या भावाचे लग्न कर्मचारी विवाह सोहळ्यात झाले. शेवटी बापू बद्दल एक वाक्य बोलावेसे वाटते, "धन्य ती माता, धन्य तो पुरुष" जि अशा महान पुत्राला जन्म देणारी, प्रत्येक जननीच्या पोटी असाच पुत्र जन्माला घाल. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

- माधवी नामदेव झांबरे

* This website is best viewed in 1366 X 768 Resolution.


Developed by Mr. Vinayak Katwe & Mr. Amit Kalshetti Maintained by Ishwar Computers