आमच्याविषयी माहिती

" गती कासवाची . . . प्रगती प्रत्येकाची . . . ! "

लोकमंगल पतसंस्था सोलापूर ही लोकमंगल उद्योग समूहाची अर्थवाहिनी आहे. लोकमंगल पतसंस्थेची स्थापना दि. २ सप्टेंबर २००२ रोजी ह.भ.प. श्री थावरे महाराज यांच्या हस्ते झाली. संस्था उभारणी मागे ठेवी गोळा करणे आणि त्या ठेवीतून गरजू गरीब शेतकरी व्यावसायिक सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट विडी कामगार महिला यांना कर्ज स्वरुपात अर्थपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनविणे हे मुख्य उद्दिष्टे होते.


संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील गरजवंत व उपेक्षित तरुणांना रोजगार मिळावा म्हणून पतसंस्थेच्या वतीने अर्थसहाय्य केले जाते. या कार्यप्रणाली मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश (भाऊ) साठे, उपाध्यक्ष श्री. बिराजदार शंकरराव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संभाजीराव (दादा) पाटील यांच्या दैनंदिन सहभाग योगदानामुळे संस्थेची प्रगतीपथावर वाटचाल चालू आहे.* This website is best viewed in 1366 X 768 Resolution.


Developed by Mr. Vinayak Katwe & Mr. Amit Kalshetti Maintained by Ishwar Computers