प्रत्येकाच्या दृष्टीची
एक मर्यादा असते
त्या मर्यादापलीकडे जाणं
तेव्हाचं अनेकांची साथ लाभते
अनेक हितचिंतकामुळे
मला दृष्टीच्याही पलीकडे जग
पाहता आलं. . .
आणि खिडकीच्याही पलीकडचं आभाळ
झेलता आलं. . .
जगण्याच्याही पुढचं जगणं
अनुभवता आलं. . .
- सुभाष देशमुख

अल्पावधीत 3५७ कोटी ठेवीकडे वाटचाल करणारी " लोककल्याणासाठी " समर्पित . . .

लोकमंगल पतसंस्था सोलापूर ही लोकमंगल उद्योग समूहाची अर्थवाहिनी आहे. लोकमंगल पतसंस्थेची स्थापना दि. २ सप्टेंबर २००२ रोजी ह.भ.प. श्री थावरे महाराज यांच्या हस्ते झाली. संस्था उभारणी मागे ठेवी गोळा करणे आणि त्या ठेवीतून गरजू गरीब शेतकरी व्यावसायिक सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट विडी कामगार महिला यांना कर्ज स्वरुपात अर्थपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनविणे हे मुख्य उद्दिष्टे होते.


संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील गरजवंत व उपेक्षित तरुणांना रोजगार मिळावा म्हणून पतसंस्थेच्या वतीने अर्थसहाय्य केले जाते. या कार्यप्रणाली मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. गुरण्णा अप्पाराव तेली, उपाध्यक्ष सौ. निर्मला भागवत कुंभार व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संभाजीराव (दादा) पाटील यांच्या दैनंदिन सहभाग योगदानामुळे संस्थेची प्रगतीपथावर वाटचाल चालू आहे.


संस्थेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणारी व सुरुवातीपासून संगणकीय सेवा देणारी पतसंस्था.
  • ३६५ दिवस सेवा देणारी एकमेव पतसंस्था.
  • प्रधान कार्यालयासह प्रत्येक शाखेत ग्रंथालयाची सोय.
  • सोने तारण कर्ज व लॉकर्सची सोय.
  • व्यावसायिक / पगारदार व्यक्तींना , बचत गट महिलांना सुलभ व तत्पर कर्ज पुरवठा.
  • शेतकऱ्यांसाठी शेती सुधारणा कर्ज.
  • देशातील विविध शहरामध्ये डी. डी. ची सुविधा उपलब्ध. / RTGS/NEFT ची सोय.
  • वीज बिल भरणा केंद्र , अवंती नगर , अक्कलकोट , बार्शी , करमाळा , पंढरपूर , सांगोला , कुर्डूवाडी , जेऊर , मोहोळ, विजापूर रोड ,श्रीपूर , करकंब, वैराग, टेंभुर्णी, वागदरी, अशोक चौक , हैद्राबाद रोड , रेल्वेलाईन , होटगी रोड , साखरपेठ शाखा .

१ वर्षाच्या पुढील ठेवीवर ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठी अर्धा टक्का ज्यादा व्याजदर
१ वर्षाच्या ठेवीवर फक्त मुलीवर कुटुंबनियोजन करणाऱ्यांना १% ज्यादा व्याजदर

धनवृद्धी

दरमहा ५००/- रु. ११० महिने १००,०००
दरमहा २५०/- रु. ११० महिने ५०,०००

लखपती

दरमहा १२००/- रु. भरा ६० महिने १००,०००
दरमहा २३००/- रु. भरा ३६ महिने १००,०००

नवीन बातमी

वीज बिल भरणा केंद्र - टेंभुर्णी, माढा, वागदरी येते महावितरण वीज बिल भरणा केंद्र गुडीपाडवा च्या मुहूर्तावर सुरु झाले आहे.

बँको पुरस्कार - AVIS Publication व Infa Galaxy यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तरीय बँको पुरस्कार २०१४ द्वितीये पुरस्कार भेटले आहे.

नवीन कार्यक्रम

तात्काळ संपर्क

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित

प्रधान कार्यालय :
९४/२९, मंगल प्लाझा, पहिला मजला, जोडभावी पेठ, सोलापूर.

(०२१७) २७३५५३७

* This website is best viewed in 1366 X 768 Resolution.


Developed by I-Friends Solution Maintained by Ishwar Computers